Dr Suresh Jangale

Director

The deepest desire to make modern medical treatments and facilities available with ease at the lowest cost to needy ones led Dr Suresh Jangale to become a medical practitioner. 

+ 91 9418047777

info@varadhospitalbidkin.com

Dr Suresh Jangale

Follow Me:

Personal experience

The deepest desire to make modern medical treatments and facilities available with ease at the lowest cost to needy ones led Dr Suresh Jangale to become a medical practitioner. He acquired his medical science degree from Chh.Sambhajinagar city. Soon after earning his graduate degree, he received many opportunities to settle in metro cities, earning a lot of money. He was determined to reach out to the rural area that most doctors just don’t even think of serving. His compassion for the needful and sense of social responsibility drove him to choose to serve the community.
Dr Suresh Jangale initiated village-to-village visits in Bidkin and more than 56 neighbouring villages where healthcare was an urgent necessity. The patients from these rural areas cannot afford to bear the heavy amount charged for treatment by big hospitals. For the convenience of his thousands of patients, he established Varad Hospital & I.C.U. in Bidkin. With the ‘ Patient First’ approach and quality services, Varad Hospital & I.C.U. soon became the only trusted hospital which offers all the healthcare facilities. And now it has extended into a three-storey Varad multi-super speciality and advance ICU. The best of modern healthcare facilities and some renowned medical consultants and surgeons are available to offer their best care under the profound guidance of Dr Suresh Jangale.
He has been actively contributing to community welfare. Responding to the community’s needs, he has been arranging blood donation camps for many years. During the Corona pandemic, Varad hospital provided free oxygen concentrator in collaboration with Lipop Social Foundation. As a Corona warrior, he effectively served patients in remote areas. He has been recognised and awarded for his noble service to the grassroots.

करुणेपेक्षा चांगला इलाज नाही’, हे वरद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एडव्हान्स आयसीयूचे प्रमुख तत्त्व आणि पाया आहे.

2009 मध्ये 3 खाटांच्या क्षमतेचे क्लिनिक स्थापित करून , 2014 मध्ये 10 खाटांच्या क्षमतेचे वरद हॉस्पिटल सुरु करून आपल्या पारदर्शकता, अत्यंत काळजी आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाने रुग्णांचे मन जिंकले. वरद हॉस्पिटल & आय सी यु हे बिडकीन येथे स्थित आहे, वेगाने विकसित होत असलेल्या पैठण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि .संभाजीनगर शहरापासून फक्त 23 किमी. अंतरावर आहे. 56 गावे आणि जवळपासच्या शहरांमधून त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या रूग्णांना आधुनिक आरोग्य सेवा, सर्वोत्कृष्ट प्रगत सुविधा आणि अद्यावत पद्धती पोहोचवण्यासाठी ते वचनबद्ध आहे.

सुरुवातीपासूनच रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने , सेट-अप, सुविधा आणि जागा विस्तार करण्याची गरज होती, म्हणून वरद मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा आणखी NABH मान्यताप्राप्त 50 बेडसह पुनर्विकास करण्यात आला आहे. आयसीयू सुविधेत सेंट्रल ऑक्सिजन ,मेडिसिन आयसीयू 05 बेड आणि 02 सर्जिकल आयसीयू बेड आहेत. 2 व्हेंटिलेटर, 2 एन.आय.व्ही.(NIV),05 कार्डियाक मॉनिटर, 05 मल्टी-पॅरा मॉनिटर्स, 02 डीफेब्रिलेटर , 05 इन्फ्युजन पंप.

अद्ययावत व सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये 9 इंचेस हाय फ्रिकवेन्सी सी-आर्म , कार्डियाक & ETCO2 मॉनिटर सह ॲनेस्थेसिया वर्कस्टेशन,सेंट्रल ऑक्सिजन, ऑटोमॅटिक ओ. टी. टेबल, सक्शन मशीन इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व सुविधांयुक्त अपघात विभाग (Casualty), ऑक्सिजन युक्त 06 बेडचे डे केअर , 10 बेडचे एक जनरल वॉर्ड आहे.तसेच रूग्णांच्या अतिरिक्त सोयीसाठी  स्पेशल रूम ,डिलक्स रूम आणि सेमी-डिलक्स रूम आहेत.

सोनोग्राफी सेंटर, डिजीटल एक्स-रे. ,डायलेसिस सेंटर ,ट्रेडमिल टेस्ट (TMT), 2 डी इको (2D Echo),कलर डॉपलर,ECG मशीन, 24 तास पॅथॉलॉजी लॅब,24 तास मेडीकल सुविधा उपलब्ध, 24 तास अॅडव्हान्स कार्डियाक अॅब्युलन्स, इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. (Cashless Insurance)

क्रिटिकल केअर (ICU),रेडिओलॉजी, हृदय विकार , ऑर्थोपेडिक्स, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी , गॅस्ट्रोएंटोरोलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, पल्मोलॉजी , यूरोलॉजी, स्त्रीरोग,त्वचा रोग,नेत्रविकार,मनोविकार, एनोरेक्टल ,पॅथॉलॉजी इत्यादी विभागांच्या प्रमुख तज्ञांचे एक पॅनल आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम खूप अनुभवी असून आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी नेहमी उत्सुक असते .

वरद मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल & ICU सर्वोत्कृष्ट देखरेख, निदान आणि उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक उपकरणांनी पूर्णपणे सुसज्ज आहे. जलद आणि तंतोतंत पॅथॉलॉजिकल चाचण्यांसाठी, पॅथॉलॉजी लॅब देखील आहे. यात 24×7 फार्मसी देखील आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्डियाक रुग्णवाहिका तत्पर आहे .

वरद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू खऱ्या अर्थाने सर्व वैद्यकीय सेवा रुग्णांसाठी एकाच छताखाली देत आहेत ज्यामुळे उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांना देखील दिलासा मिळेल. इतकेच नाही तर पर्यावरण प्रेमी डॉ सुरेश जंगले यांनी हॉस्पिटल मध्ये सोलर सुविधा कार्यान्वयीत केली आहे.
वरद मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी करणारा दृष्टीकोन म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांना परवडणाऱ्या शुल्कात सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा त्यांच्या दरात उपलब्ध व्हाव्यात. व्यावसायिकरित्या प्रशिक्षित दमदार कर्मचारी आणि डॉक्टरांची संपूर्ण टीम गेल्या 13 वर्षांपासून अथक परिश्रमातून रूग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे, ज्यामुळे वरद मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल & ICU हे कोणत्याही उपचारांसाठी सर्वात पसंतीचे पर्याय बनले आहेत

डॉ सुरेश जंगले

गरजूंना कमीत कमी खर्चात आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सुविधा सहज उपलब्ध करून देण्याची तीव्र इच्छा डॉ सुरेश जंगले यांना वैद्यकीय व्यवसायी बनण्यास प्रवृत्त केले. त्यांनी छ. संभाजीनगर शहरातून वैद्यकीय शास्त्राची पदवी संपादन केली. पदवी मिळविल्यानंतर लगेचच त्यांना मेट्रो शहरांमध्ये स्थायिक होण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा निर्धार होता. ग्रामीण नागरिकांच्या वैद्यकीय समस्या , त्यांची आर्थिक परिस्थिती आणि तिथे असणाऱ्या सुविधांचा अभाव या बद्दल त्यांच्या जाणिवा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेने त्यांना ग्रामीण भागात सेवा करण्याची निवड करण्यास प्रवृत्त केले.

डॉ.सुरेश जंगले यांनी बिडकीन आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गावोगावी व्हिजिट सुरू केल्या, जिथे आरोग्य सेवेची नितांत गरज होती. या ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयांकडून उपचारासाठी आकारण्यात येणारी भरमसाट रक्कम परवडत नाही. आपल्या हजारो रुग्णांच्या सोयीसाठी त्यांनी बिडकीन येथे वरद हॉस्पिटलची स्थापना केली. ‘पेशंट सर्वात अगोदर ‘ दृष्टीकोन आणि दर्जेदार सेवांमुळे वरद हॉस्पिटल लवकरच सर्व आरोग्य सुविधा देणारे एक विश्वसनीय हॉस्पिटल बनले आहे. आणि आता ते तीन मजली वरद मल्टी स्पेशालिटी & ICU मध्ये विस्तारले आहे. डॉ सुरेश जंगले यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली उत्तमोत्तम आधुनिक आरोग्य सुविधा आणि नामवंत तज्ञ डॉक्टर्स आणि सर्जन उपलब्ध आहेत.

समाज कल्याणासाठी ते सक्रिय योगदान देत आहेत. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन ते अनेक वर्षांपासून रक्तदान शिबीर आयोजित करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात, वरद हॉस्पिटलने लिपोप सोशल फाऊंडेशनच्या सहकार्याने मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुविधा प्रदान केली. एक कोरोना योद्धा म्हणून त्यांनी दुर्गम भागातील रुग्णांची प्रभावीपणे सेवा केली.
तळागळातल्या त्यांच्या उदात्त सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे.